अनेक दहशदवादी घटनांमध्ये सहभागी असलेला आणि भारतातून निसटून पाकिस्तानात पळालेला दहशतवादी हरविंदर सिंघ रिंदा याचा मृत्यू झाला आहे. अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. मात्र, त्याची हत्या करण्यात आल्याचाही दावा केला जातं आहे. दुसरीकडे, किडनी निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.
मोस्ट वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा हा प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य होता. या वर्षी मे महिन्यात मोहाली येथील पंजाब पोलिस मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ल्यात त्याचे नाव आले होते. याशिवाय मे महिन्यातच हरियाणात एका वाहनातून शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. यामागेही रिंदाचा हात होता, अशी माहिती समोर आली होती. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून काम करत होता. त्याने पंजाबसह देशात दहशत पसरवण्याची कारस्थाने केली आहेत.
रिंदा हा पंजाबमधील तरनतारनचा रहिवासी होता. तो नंतर महाराष्ट्रात स्थलांतरित झाला होता. पुढे तो शिक्षण घेण्यासाठी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात गेला आणि याच दरम्यान रिंदाने गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवले. तपासादरम्यान तो बनावट पासपोर्ट वापरून नेपाळमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे समोर आले. तरनतारन येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी रिंदाला सप्टेंबर २०११ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हे ही वाचा :
‘पराभवाच्या भीतीने राहुल गांधी प्रचारात नाहीत’
पुण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार, एकाच वेळी ३६ राजीनामे
सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद
स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न
२०१४ मध्ये त्याने पटियाला सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. इतकंच नाही तर एप्रिल २०१६ मध्ये रिंदाने चंदीगड येथील पंजाब विद्यापीठात स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षावरही गोळीबार केला होता.