पुण्यात व्होट जिहाद, २१ बांगलादेशींना अटक!

बनावट मतदान कार्ड, भारतीय आधार कार्ड, पेन कार्ड जप्त

पुण्यात व्होट जिहाद, २१ बांगलादेशींना अटक!

लोकसभेत निर्माण झालेली ‘व्होट जिहाद’ ही संज्ञा राज्याच्या विधानसभेतही लागू होण्याची चिन्हे आहेत. व्होट जिहाद नुसार, मुस्लीम मतदारांचा एक गठ्ठा एखाद्या पक्षाला मतदान करतो. तसेच लगतच्या राज्यातून तेथील नागरिकांना अवैद्यरित्या भारतात प्रवेश करून घेवून त्यांचा मतदाना करिता वापर करायचा. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यावरून प्रत्येक वेळी भाजपाने आवाज उठवला आणि विरोध केला आहे. अशातच आणखी एक ‘व्होट जिहाद’ची घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे पोलिसांनी तब्बल २१ बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेतले आहे, जे बेकायदा वास्तव्य करत होते. विशेष म्हणजे, यांच्याकडून भारतीय बनावट मतदान कार्ड, भारतीय आधार कार्ड, पेन कार्ड आढळून आले आहे.

दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी संयुक्त कारवाई करत रांजणगाव एमआयडीसी मधुन बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २१ बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेतले. दिनांक २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकातील सहाय्यक फौजदार विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक हे बेकायदेशीरपणे रहात आहेत.

सदर खात्रीलायक माहितीवरून पथकाने कारेगाव परीसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी संशयीत इसमांचा शोध घेतला असता मौजे कारेगावच्या हद्दीमध्ये भाड्याने राहत असलेल्या २१ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये १५ पुरुष, ४ महिला व २ तृतीयपंथींचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांची चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरीक असुन त्यांनी भारतात बेकायदेशीररित्या भारत-बांगलादेश सिंमा ओलांडुन प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.

तसेच पुणे जिल्हयातील कारेगावमध्ये बनावट भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड प्राप्त करून वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. २१ जणांपैकी ९ जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व एकाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले.

हे ही वाचा : 

रशिया- युक्रेनमध्ये शांततेसाठी भारत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार

शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच

ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत…

आरजी कार पीडीतेच्या वडिलांनी मागितली अमित शहांकडे वेळ

अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान (५०), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (३२), शफिकउल अलीमिया शेख वय (२०), हुसेन मुखिद शेख (३०), तरिकुल अतियार शेख (३८), मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख (३२), शाहिन शहाजान शेख (४४), मोहम्मद हुसेन शेख (३२), रौफ अकबर दफादार (३५), इब्राहिम काजोल शेख (३५), फरीद अब्बास शेख (४८), मोहम्मद सहाम अब्दुल सखावती (३५), मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (३२), आलीमिया तोहकील शेख (६०), मोहम्मद इसराईल फकीर (३५), फिरोजा मुताकीन शेख (२०) , लिपीया हसमुख मुल्ला (३२),  सलमा मलीक रोशन मलीक (२३),  हिना मुल्लाः जुल्फीकार मुल्ला (४०), सोनदिय उर्फ काजोल वासुदिप बिशेश (३०), येअणुर शहदाता मुल्ला (२५) अशी अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Exit mobile version