‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केले आरोप

‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या

लोकसभा निवडणुकीनंतर ‘व्होट जिहाद’चा मुद्दा पुन्हा एकदा राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान समोर आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार व्होट जिहादवर भाष्य केले आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी दावा केला होता की, मालेगाव बँकेत बेनामी हवालाद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये आले आणि नंतर हे पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले. या आरोपानंतर खळबळ उडाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून महाविकास आघाडीवर व्होट जिहाद होत असल्याचा आरोप केला जात आहे. यासोबतच भाजपाने व्होट जिहादसाठी कोट्यवधींचा निधी मिळाल्याचा दावाही केला. दरम्यान, मालेगाव पोलिसांनी बुधवारी (१३ नोव्हेंबर) या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना अटक केली आहे. आरोपी सिराज मोहम्मदचे २४ बेनामी बँक अकाऊंट मालेगावच्या नाशिक मर्चंट बँक आणि महाराष्ट्र बँकेत सापडले, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

व्होट जिहादच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मालेगाव बँकेत बेहिशोबी १२५ कोटी रुपये आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. १२५ कोटी रुपये विविध बँक खात्यात जमा होऊन तो पैसा विविध खात्यात हस्तांतरीत केल्याचा आणि रोख रक्कम वाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. तर यापूर्वी मालेगावमध्ये २५० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम आल्याचे समोर आले होते. हवाला रॅकेटद्वारे ही रक्कम येत असल्याचे समोर आले होते.

हे ही वाचा : 

राजस्थान: मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून राडा; ६० जणांना अटक

झारखंड निवडणूक; पहिल्या टप्प्यात ६४ टक्के मतदान!

जोगेश्वरीत उबाठा उमेदवार अनंत (बाळा) नर कडून गुंडगिरी, महिलांचा विनयभंग!

कोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री

एका महिन्यात देशभरातील २०० बँक खात्यातून २५०० व्यवहार झाले. मालेगाव येथील सिराज अहमद आणि मोईन खान यांनी गरीब लोकांच्या नावाने बँक खाती उघडली. त्यात चार दिवसांत १२५ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यातील ३७ खात्यातील जमा रक्कम रोखीत बदलण्यात आली आणि ही रक्कम लागलीच काढण्यात आली.

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय सीबीडीटी, आरबीआयसह अनेक ठिकाणी लिखित तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली होती. याप्रकरणात मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही रक्कम परदेशातून आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Exit mobile version