मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. चिनी मोबाईल कंपनी असलेल्या व्हिवोच्या चार अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली आहे. यामध्ये एका चिनी नागरिकासह लाव्हा इंटरनॅशनल या मोबाईल कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डिरेक्टर यांचाही समावेश आहे.
गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणी देशभरात ४८ ठिकाणी झालेल्या छापेमारीनंतर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू होता. त्यानंतर या प्रकरणी अधिक तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींमध्ये लावा इंटरनॅशनलचे एमडी, चार्टर्ड अकाउंटंट आणि एका चिनी नागरिकाचा समावेश आहे. तपास एजन्सीने सोमवारी आरोपींशी संबंधित असलेल्या जागेवर छापा टाकला आणि १० लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. लाव्हा कंपनीच्या हरी ओम राय यांचा या प्रकरणात नेमका सहभाग काय आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा:
मुंबईत मनसेचे टोलनाका आंदोलन पेटले; नवघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे
‘गडकरी’ सिनेमाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित
भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत
सॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार कोटींचा घोटाळा
ईडीच्या म्हणण्यानुसार, भारतात कराचा भरणा टाळण्यासाठी व्हिवो कंपनीने चीनला बेकायदेशीरपणे ६२ हजार ४७६ कोटी रुपये हस्तांतरित केले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू होता. त्यानंतर ईडीने कंपनीवर छापा टाकला होता. ईडीने चिनी नागरिक आणि अनेक भारतीय कंपन्यांचा समावेश असलेल्या मोठ्या मनी लाँड्रिंग रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला होता.