सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

या व्हीडिओनंतर तुरुंगातील प्रशासनावर आक्षेप

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. तुरुंगातील त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सत्येंद्र जैन यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. आरामात त्यांचे मालिश सुरु असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओनंतर तुरुंगातील प्रशासनावर आक्षेप घेतला जातं आहे. याप्रकरणी ईडीने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सत्येंद्र जैन यांचे एकूण तीन व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांच्या पायाला, डोक्याला आणि शरीराला मसाज करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोपही ईडीने काही दिवसांपूर्वी केला होता.

व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, बेडवर पडून सत्येंद्र जैन काही कागद बघत आहेत. बेडजवळ ठेवलेल्या खुर्च्याही आरामदायी दिसतं आहेत. त्यांच्या पलंगावर ऑर्थोपेडिक उश्यांसारखी उशीही दिसते. रिमोट उशीवर पडलेला आहे. खोलीत मिनरल वॉटरच्या बाटल्याही दिसतात.

हे ही वाचा : 

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

राहुल गांधींनी शेगावमध्ये सावरकरांबद्दल बोलणे टाळले

मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात आहेत. सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या तुरुंगात आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. शिवाय ३५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचे ठिकाण बदलली असल्याची माहिती आहे.

Exit mobile version