संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नांदेडमध्ये शीख तरूणांकडून पोलिसांवरच हल्ला

संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नांदेडमध्ये शीख तरूणांकडून पोलिसांवरच हल्ला

सोमवारी महाराष्ट्रात सगळीकड़े होळी, रंगपंचमीचा उत्साह असताना नांदेड जिल्ह्यात मात्र पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात शीख समाजाच्या तरुणांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. जमावाकडून पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नांदेडमधील वातावरण सध्या तणावाचे झाले आहे.

महाराष्ट्रात सध्या देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक निर्बंध कडक करत रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यातीलच एक जिल्हा म्हणजे नांदेड. नांदेडमधील कोरोना परिस्थिती लक्षात घेता नांदेडमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

अशा परिस्थितीत नांदेड मधील शीख समाजाला ‘होला मोहल्ला’ हा त्यांचा धार्मिक उत्सव सार्वजनिकपणे साजरा करायला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. गुरुद्वारा समितीला यासंबंधी कळविण्यात आले होते आणि त्यांनी हा उत्सव गुरुद्वाराच्या आताच साजरा करण्याचे मान्य केले होते. पण सोमवारी अचानक ४ वाजताच्या सुमारास शीख जमावाकडून निशान साहिब गुरुद्वाराच्या दरवाज्यावर आणण्यात आला. अंदाजे ३०० ते ४०० तरुणांचा जमाव होता. हा जमाव पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला. एका क्षणी हे सगळेच नियंत्रणाबाहेर झाले आणि त्यांनी बंद असलेले गेट तोडले. ते पोलिसांवर धावून गेले. त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात चार पोलीस अधिकारी जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

Exit mobile version