24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामामणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

मणिपूरमधील हिंसाचार चिघळला; दंगलखोरांनी शाळा पेटवली

चूडाचांदपूर आणि विष्णूपूर जिल्ह्याच्या सीमेवरील एका शाळेला दंगलखोरांनी आग लावली

Google News Follow

Related

मणिपूरमधील परिस्थिती अधिक चिघळली आहे. गोळीबारादरम्यान एका शाळेला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. विष्णूपूर आणि चूडाचांदपूर येथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यातच राज्यातील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
चूडाचांदपूर आणि विष्णूपूर जिल्ह्याच्या सीमेवरील एका शाळेला दंगलखोरांनी आग लावली. त्यातच क्वात्ता भागातील हिंसेदरम्यान एका महिलेला गोळी लागली. तिला तत्काळ इम्फाळमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. गेल्या काही दिवसांत पुन्हा भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर रविवारीही अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या.

परिसरात सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे. तर, शाळेला आग लागल्याने सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शाळेच्या प्रशासकांतर्फे सांगण्यात आले. यात पुस्तके, फर्निचर आणि भांड्यांचे नुकसान झाले. ३ मेपासून सुरू झालेल्या हिंसाचारापासून मणिपूरमधील ही शाळा रिकामी होती. तर, सरकारने याआधीच शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

सात्विक-चिरागला वर्षातील तिसरे विजेतेपद !

न्यायाधीशांचा कुत्रा हरवला; सुरक्षा कर्मचाऱ्याला निलंबित करा!

मुंबईत तस्करी करून आणलेली ३० कोटींची घड्याळे जप्त

मिझोराममधील मैतेई समुदाय भीतीमुळे स्थलांतर करण्याच्या तयारीत

या शाळेचे नाव चिल्ड्रन्स ट्रेजर हायस्कूल असे आहे. ‘सुदैवाने शाळेच्या पहिल्या मजल्यावर कोणीही नव्हते. भवनाच्या आजूबाजूच्या अनेक घरांना आगी लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे आम्ही सतर्क होतो. शाळेचा चौकीदार याआधीच त्याच्या कुटुंबीयासोबत पळून गेला आहे,’ अशी माहिती या शाळेचे प्रमुख लियान खो थाग वेइफी यांनी दिली. या घटनेमुळे राज्यातील अन्य शाळांमध्येही भीतीचे वातावरण आहे. असेच होत राहिल्यास येथील मुलांच्या शिक्षणावर बिकट परिणाम होण्याची भीती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा