उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडल्यामुळे त्यात कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर गदारोळ झाला. यावेळी दोन समाजांमध्ये राडा झाला आणि दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीमार केल्यानंतर यतिमखानाजवळील बेकोनगंज भागात हिंसाचार झाला. या निषेधार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले. या दगडफेकीत दहापेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. संबंधित परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कानपूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
हे ही वाचा:
भावाच्या हत्येचा गँगने घेतला बदला
भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांत सहाव्या जागेसाठी चुरस निश्चित
‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’
राष्ट्रवादी काँग्रेसचे PFI शी साटेलोटे
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. रामनाथ कोविंद यांच्या गावी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी कानपूरमध्ये विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत.