23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादेशातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट

देशातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट

नवीन पुस्तकात दावा

Google News Follow

Related

अलिकडच्या वर्षांत भारतात हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. ‘इंटर्नल सिक्युरिटी इन इंडिया :व्हॉयलन्स, ऑर्डर, अँड द स्टेट’ या नवीन पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आला आहे. अमित आहुजा आणि देवेश कपूर यांचे हे आगामी पुस्तक आहे. देशात २०१० पासून दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या २० वर्षांत भारतात हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक अमित आहुजा आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे प्राध्यापक देवेश कपूर यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात, गेल्या अनेक दशकांतील राजकीय हिंसाचार, वांशिक आणि धार्मिक हिंसाचार, दहशतवाद आणि राजकीय हत्या आणि विमान अपहरण यासारख्या घटनांचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास करून अधिकृत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर भारतात हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. १९७० ते २०० दरम्यान देशात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या, मात्र त्यानंतर त्यात घट झाली आहे असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

२००२ च्या गुजरात दंगलीपासून भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात वांशिक-धार्मिक हत्या झालेल्या नाहीत, असे या पुस्तकात म्हटले आहे. २०१३ मध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि २०२० मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दंगल झाली असली, तरी या दोन्ही दंगलींमध्ये एकूण ९० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे, यावरून भारतात हिंसाचाराचे घटक अजूनही अस्तित्वात असल्याचे दिसून येते. १९८४ ची शीख दंगल, ९८३ च्या आसाममधील बांगलादेशी मुस्लिमांविरुद्धच्या दंगलींचाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

पुस्तकानुसार, २०००ते २०१० दरम्यान देशात ७१ दहशतवादी घटना घडल्या. त्याचे प्रमाण कमी होऊन २०१० मध्ये ते २१ वर आले आहे. १९७० ते २००२ गुजरात दंगलीपर्यंत देशात हिंदू-मुस्लिम हिंसाचार झाला. आता सरकारी आकडेवारी दर्शवते की सध्या देशात हिंदू मुस्लिम हिंसाचाराच्या घटना स्थिर आहेत. २०१७ ते २०२१ या कालावधीत अशा२,९०० पेक्षा जास्त अधिक घटना घडल्या ज्या पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा