अमरावती, मुंबईनंतर बीडमध्येही धार्मिक कार्यक्रमात हिंसाचार

अमरावती, मुंबईनंतर बीडमध्येही धार्मिक कार्यक्रमात हिंसाचार

राज्यात धार्मिक कार्यक्रमांमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीडमधील वळवणी तालुक्यातील उपळी गावातील दगडफेकीची घटना समोर आली आहे. जोतिबाच्या यात्रेत उपळी आणि गावंदरा या गावांमधील तरुणांमध्ये दगडफेक झाली. यात्रेसाठी भाविकांनी उपळी गावात मोठी गर्दी केली होती त्यावेळी ही घटना घडली.

कोरोना निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षानंतर अशा यात्रा असताना काही समाजकंटकांकडून उत्सवाला गालबोट लागत असल्याच्या घटना घडत आहेत. रविवार, १७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उपळी आणि गावंदरा या गावांमधील दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर याचे रुपांतर हिंसाचारात झाले आणि दगडफेक झाली. नंतर काही तरुण घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची पोलीस तक्रार करण्यात आली का किंवा या घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा:

कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

लाऊडस्पीकरसाठी येणार राज्यात नव्या गाईडलाईन्स?

मुंबई पोलिसांचा ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रीय

दरम्यान, अमरावती आणि मुंबईतही अशा हिंसक घटना घडल्या आहेत. अमरावतीमधील अचलपूर येथे झेंडा काढल्यावरून दोन गटात झालेल्या वादानंतर अचलपूर आणि परतवाडा येथे कलम १४४ लागू करण्यात आले. तर मुंबईतील आरे कॉलनीमधील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना घडली. आरे कॉलनीत शिव कलश यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

Exit mobile version