मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

मुंबईतील मानखुर्द परिसरात राम नवमी निमित्त आयोजित मिरवणुकीत मोठा वाद झाला होता. मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद निर्माण झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर परिसरात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.

मुंबईतील मानखुर्दच्या पीएमजीपी परिसरात रविवार, १० एप्रिल रोजी राम नवमी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, दोन गटात मारामारी झाली. ३० ते ४० जणांच्या जमावाने ही तोडफोड केली. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी परिसरातील १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणा दरम्यान दगडफेकही करण्यात आली. ही घटना रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलीस आणि दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी पोहोचले .या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच घटनेचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. सध्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Exit mobile version