मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार

मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार

मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत दोन गटांमध्ये रविवार, १७ एप्रिल रोजी हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरे कॉलनीमधील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान ही हिंसाचाराची घटना घडली. आरे कॉलनीत शिव कलश यात्रेच्या मिरवणुकीत दोन गटात वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतल्या आरे कॉलनीतील गौतम नगर भागात काल रात्री दोन गटात राडा झाला. परिसरातील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान रात्री ८ वाजता दोन गटात वाद झाला आणि नंतर या गटांमध्ये मारामारी झाली. या हिंसाचारात ८ ते १० जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या घटनेसाठी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू 

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….

… म्हणून WHO चे महासंचालक येणार भारत दौऱ्यावर

‘जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात’

दरम्यान, अमरावती येथेही झेंडा काढल्यावरून वाद झाले आणि त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला आणि परिस्थिती चिघळू नये म्हणून अचलपूर आणि परतवाडा परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या हिंसाचार प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली असून ३५ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version