31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाविनायक मेटे यांच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

विनायक मेटे यांच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

लवकरच अटक होण्याची शक्यता

Google News Follow

Related

शिवसंग्राम संघटनेचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी बुधवारी त्यांच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे विभागाने रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यात चालक एकनाथ कदम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताचा तपास सीआयडीकडे सोपवला होता. याप्रकरणी सीआयडीने ट्रकचालकाला अटक केली आहे. तपासाअंती सीआयडीने आज रसायनी पोलिस ठाण्यात मेटे यांच्या चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सीआयडीने फिर्यादीत म्हटले आहे की, चालक भरधाव वेगाने कार चालवत होता आणि त्याच्याच चुकीमुळे ट्रकला धडकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे हे १४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातून मुंबईकडे कारने येत होते. पहाटे ५.३० वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ मेटे यांची कार अचानक ट्रकला धडकली. विनायक मेटे कार मध्ये उजव्या हाताला असले होते अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात जखमी झालेल्या मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा :

क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!

विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे

हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स

अपघातानंतर एक तास कोणाची मदत मिळाली नाही. आपण रस्त्यावर मोटारींना थांबवण्याचाही आपण प्रयत्न करत होतो परंतु कोणी मदत केली नाही असाही आरोप असा आरोप मेटे यांच्या चालकाने केला होता . सीआयडीने या प्रकरणांमध्ये चालक कदम याला दोषी ठरवले आहे . अपघात आणि आकस्मिक मृत्यूसाठी कदम याला जबाबदार धरण्यात आले आहे त्यामुळे आता त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. कदम याच्यावर दाखल केलेल्या कलमानुसार त्याला दोन ते चार वर्ष शिक्षा होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा