गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील गावकऱ्यांनी एका दलित व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीच्या पुतण्याने क्रिकेटचा चेंडू उचलला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पाटण जिल्ह्यातील काकोशी गावात शाळेच्या मैदानात क्रिकेट मॅच सुरू असताना मुलाने चेंडू उचलला. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने संबंधित मुलाला धमकावले. तसेच दलित समाजाच्या सदस्यांचा अपमान आणि धमकावण्याच्या उद्देशाने काही जातीवादी अपशब्द देखील वापरल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
त्यानतंर त्या मुलाचे काका धीरज परमार यांनी अपशब्दांवर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण मिटले होते. पण, त्याच दिवशी संध्याकाळी सात जणांच्या गटाने तीक्ष्ण शस्त्रे घेऊन फिर्यादी धीरज आणि त्याचा भाऊ कीर्ती यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तेव्हा एका आरोपीने कीर्ती यांचा अंगठा कापून त्यांना गंभीर जखमी केल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या चार जणांना अटक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित!
किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले
त्यानंतर कलम ३२६ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रांनी गंभीर दुखापत करणे), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि भारतीय दंड संहिता (IPC) आणि SC आणि ST (अत्याचार प्रतिबंधक कायदा) च्या इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोधही सुरू आहे.