27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाविकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या

विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या

घरातचं धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची माहिती

Google News Follow

Related

विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख आणि बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश साहनी यांचे वडील जीतन साहनी यांची हत्या करण्यात आली आहे. घरात धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. दरभंगाच्या एसएसपींनी याला दुजोरा दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीतन साहनी यांचा मृतदेह घरामध्ये अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपास करत आहेत. जीतन साहनी यांचे घर दरभंगा येथील सुपौल बाजारच्या अफजला पंचायतमध्ये आहे. तेथेच त्यांचा मृतदेह आढळून आला.

अहवालानुसार, जीतन साहनी यांची घरातच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बिहारमध्ये मुकेश सहनी विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख आहेत. निवडणुकीपूर्वीच त्यांचा पक्ष महाआघाडीत सामील झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे डील मुकेश सहनी आणि RJD यांच्यात झालं होता. हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी एसपी देहाट (दरभंगा) यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करेल. एसआयटी एसपी देहाट (दरभंगा) यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करेल. एसपी देहाट यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पथक त्याची चौकशी करणार आहे.

हे ही वाचा:

डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात; पाच भाविकांचा मृत्यू

विशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करा, शस्त्रसाठा जप्त करा

मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?

मुकेश साहनी सध्या मुंबईत आहेत. वडिलांच्या हत्येची बातमी मिळताच ते मुंबईहून पाटण्याला रवाना झाले आहेत. मुकेश साहनी यांचे वडिलोपार्जित घर दरभंगाच्या सुपौल मार्केटमध्ये आहे. त्यांचे वडील जीतन या घरात एकटेच राहत होते. मुकेश साहनी यांच्या आईचे खूप पूर्वी निधन झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री काही लोक जितन साहनी यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसले होते, असे प्रथमदर्शनी दिसते. याला जीतनने विरोध केला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा