विजय मल्ल्याला चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा

विजय मल्ल्याला चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा

सर्वोच्च न्यायालयाने फरारी विजय मल्ल्याला अवमान प्रकरणी चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी विजय मल्ल्याला दोन हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय परदेशात हस्तांतरित केलेले ४० दशलक्ष डॉलर्स चार आठवड्यात भरावेत, असे आदेशही विजय मल्ल्याला देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यामध्ये न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश होता. विजय मल्ल्याने परदेशी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याबाबत न्यायालयाला चुकीची माहिती दिली आणि तर गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयात हजर न राहून न्यायालयाचा अवमान केला आहे. मल्ल्याला २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

हे ही वाचा:

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण

जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!

गँगस्टर अबू सालेमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; शिक्षेतून दिलासा नाही

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

सर्वोच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला सुनावणी पुढे ढकलत मल्ल्याला आपली बाजू मांडण्याची शेवटची संधी दिली होती. पुढील सुनावणीत हजर झाला नाही किंवा त्याच्या वकिलामार्फत आपली बाजू मांडली नाही, तर शिक्षेबाबतची कारवाई थांबवली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते.

Exit mobile version