काँग्रेस नेत्याने पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की

पोलिसांनी गुन्हा दाखल करत आसिफ खान यांना अटक केली आहे.

काँग्रेस नेत्याने पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की

काँग्रेस नेते आणि माजी आमदार आसिफ मोहम्मद खान यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते एसआयसह दोन दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी देत आहेत. याप्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ खान यांनी एका उपनिरीक्षकाला शिवीगाळ तर केलीच, पण त्याला मारहाणही केली. शिवाय, असिफ खान यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सर्वांसमोर धडा शिकवण्याची धमकी दिली होती. तसेच आसिफ खान यांच्या समर्थकांनी पोलिसांनी घेरले आणि त्यांना धमकी देत होते. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी वेळेवर तेथून पळ काढला होता. पुढे आसिफ खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे आसिफ खान जेव्हा पोलिसांना धक्काबुक्की करत होते. तेव्हा त्यांचे समर्थक तेथे उभे राहून घोषणाबाजी करत होते, टाळ्या वाजवत होते. आसिफ खान सब इन्स्पेक्टर अक्षय यांना धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

आसिफ यांनी प्रचारासाठी गर्दी जमवली आणि आप उमेदवाराबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली. विरोधी उमेदवाराने कसे गैरवर्तन केले, हे सांगू लागले. आसिफ खान तय्यब मशिदीबाहेर लोकांना संबोधित करत असताना उपनिरीक्षक अक्षय तेथे पोहचले. आसिफ खान यांना गर्दी जमवून भाषण देण्यास अक्षय यांनी मनाई केली यानंतर आसिफ खान भडकले आणि धक्काबुक्की करत शिवीगाळ करू लागले.

हे ही वाचा:

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

पोलिसांनी आसिफ खानविरुद्ध कलम १८६, ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर वाजिद खान यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आसिफ खान काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा आमदार आणि दोनदा नगरसेवक राहिले आहेत.

Exit mobile version