सामुहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या व्हिडीओ तपास यंत्रणांच्या हाती लागल्या असून पाच व्हिडीओ मोबाईलमधून शोधण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, व्हिडीओ क्लिप मिळाल्याच्या वृत्ताला अद्यापही दुजोरा मिळालेला नाही. काही आरोपींनी व्हिडीओ डिलीट केल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणातील चार आरोपी फरार असून त्यांचे फोनही बंद असल्यामुळे त्यांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात ३३ जणांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी २९ जणांना पोलिसांनी शुक्रवारपर्यंत अटक केली होती. अजूनही चार आरोपी फरार आहेत. गुरुवारी अटक केलेल्या २३ आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधारगृहात केली आहे. तर इतर आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
पुरात सर्वस्व वाहून गेले आता कागदपत्रं आणायची तरी कुठून?
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
‘यश राज’ च्या ४ चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर
महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार
चार फरार आरोपींपैकी एकाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्याच्या घराचा दरवाजा सताड उघडा आढळून आला. त्याच्या आई- वडिलांचे निधन झाल्यामुळे तो एकटाच राहत होता. पोलीस अटक करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळताच त्याने पळ काढल्याची माहिती सूत्रांमार्फत ‘लोकमत’ला मिळाली.
या प्रकरणात विशेष महिला तपास अधिकारी म्हणून ठाणे विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांची नेमणूक केली आहे. आरोपींची चौकशी त्या स्वतः करत असून त्यांच्या मदतीला एक हवालदार देण्यात आला आहे. स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून आरोपींचा शोध सुरू असून इतर आरोपींचा जबाब नोंदवणे आणि चौकशी करणे याची जबाबदारी सोनाली ढोले यांच्यावर आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना या चौकशीपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.