हेल्मेटशिवाय स्कूटी चालवल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यक्तीने ट्रॅफिक पोलिसाच्या बोटाचा चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. बेंगळुरू मधील १२ फेब्रुवारी रोजी विल्सन गार्डन परिसरात ही घटना घडली.ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती हेल्मेट न घातल्यामुळे, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्याला थांबल्यानंतर पोलिसांशी तो वाद घालताना दिसत आहे.सय्यद शफी असे चालकाचे नाव आहे.सय्यदने पोलिसांशी जोरदार वाद घालत पोलिसांकडून स्कूटीच्या चाव्या हिसकावण्याच्या प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने पोलीस अधिकाऱ्याचे बोट चावले.
हे ही वाचा:
हमासच्या ताब्यातून दोन इस्रायली नागरिकांची सुटका!
शेतकरी आंदोलनात दिसला खलिस्तानी ध्वज!
पंतप्रधान मोदी दोन दिवसीय युएई दौऱ्यावर रवाना!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू!
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबाबत इंडिया टुडेला अधिक माहिती दिली.ते म्हणाले की, एफटीव्हीआरचा (ट्राफिक कॉन्स्टेबलने वापरलेला मोबाइल फोन) वापर करून ‘हेल्मेट न घालणे’, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॉन्टॅक्टलेस केस दाखल करण्यात आला होता.
उल्लंघन करणाऱ्याने कॉन्स्टेबलवर आरोप करत वाद घातला आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी त्याच्या स्कूटीच्या चाव्या काढून घेतल्या होत्या.त्या चाव्या परत मिळवण्यासाठी तरुणाने कॉन्स्टेबलचे बोट चावले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.तसेच चालक सय्यद शफीला तत्काळ अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.