जापनीज बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची २७ व्या मजल्यावरून उडी

जापनीज बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची २७ व्या मजल्यावरून उडी

जापनीज बँकेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्लोक कपूर यांनी राहत्या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी परळ येथे घडली. मानसिक तणावात त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसानी अपमृत्युची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

श्लोक शशिकांत कपूर (४२) असे या सिनियर व्हाईस प्रेसिडेंटचे नाव आहे. परळच्या अशोका टॉवर्सच्या १६ व्या मजल्यावर कुटूंबासह राहणारे श्लोक यांची बँके वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे. ‘सुमिटोमो मितसुई बँक’ असे या बँकेचे नाव आहे. श्लोक हे या बँकेचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास श्लोक हे रक्ताच्या थारोळ्यात राहत्या इमारतीच्या खाली सुरक्षा रक्षकांना आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना कळविले.

भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्लोक यांना तातडीने केईएम रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा:

पुतीनना भेटलात, मग भोगा कर्माची फळे

स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कविता’चे स्वा. सावरकर आत्मार्पण दिनी प्रकाशन

अडकलेल्या विद्यार्थ्यांना सूचना गाड्यांवर तिरंगा लावा

‘या’ बातमीमुळे अदानी पॉवरचे शेअर्स झपाट्याने वाढले…

याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला असता श्लोक हे मागील काही महिन्यांपासून मानसिक तणावात होते, त्यांच्यावर खाजगी डॉक्टरांकडे उपचार देखील सुरू होते अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. शुक्रवारी सकाळी श्लोक घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर ते कुठे गेले याबाबत कुटुंबियांना काहीही कळविले नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्लोक हे घरातून बाहेर पडले आणि थेट २७ व्या मजल्यावरील रिफ्युजी एरिया मधून उडी घेऊन आत्महत्या केली.

Exit mobile version