वाझेच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ

वाझेच्या कोठडीत दहा दिवसांची वाढ

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया निवासस्थानाबाहेर आढळलेल्या विस्फोटकांप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेला सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला एनआयएच्या विशेष कोर्टाने मोठा दणका दिला आहे. वाझेंच्या कोठीडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाझेला ९ दिवस एनआयएच्या ताब्यात राहावं लागणार आहे.

सचिन वाझेला यापूर्वी एनआयएने १४ मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेच्या कोठडीत नऊ दिवसांची म्हणजे ३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

यावेळी एनआयएने कोर्टाला आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेला पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून ३० जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. ३० पैकी पाच बुलेट्स वाझेकडे आहेत. मात्र २५ काडतुसे गायब आहेत. ही २५ काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.

हे ही वाचा:

तर आम्ही चार पाकिस्तान बनवू- तृणमूल नेता

सचिन वाझे विरोधात खंडणीची तक्रार

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

वाझेवर यूएपीए लावण्यात आला आहे. त्यातच आता कोर्टानेही त्याच्या कोठडीत वाढ केल्याने वाझेकडून अजून काही माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा कट कसा रचला गेला? तसेच जिलेटीन आणून देण्यात कुणी कुणी मदत केली, याचीही माहिती एनआयएला मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिली.

Exit mobile version