‘हिरेनने आत्महत्या केल्याचे वाझेने मुख्यमंत्र्यांना पटवून दिले’

‘हिरेनने आत्महत्या केल्याचे वाझेने मुख्यमंत्र्यांना पटवून दिले’

एसीपीने एनआयएला दिलेल्या जबाबात ही बाब झाली उघड

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचणारा बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचे समोर येत असून हिरेन यांची हत्या नव्हे तर आत्महत्या आहे, हे मुख्यमंत्र्यांना पटवून देण्याचा प्रयत्न त्याने केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे एका सहाय्यक पोलिस आयुक्ताने हा जबाब दिलेला आहे, असे टाइम्स वृत्त समुहाने म्हटले आहे.

या अँटिलिया प्रकरणासंदर्भात विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार आवाज उठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ५ मार्चला बैठक घेतली. तिथेच वाझेने मुख्यमंत्र्यांना सांगितले की, हिरेनने आत्महत्या केली. मात्र तेव्हा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ते अमान्य केले, असे या एसीपीने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. एनआयएने जवळपास २०० लोकांचे जबाब यासंदर्भात नोंदविले आहेत.

हे ही वाचा:

…म्हणून नवऱ्याने दोन महिन्यांच्या मुलीला टाकून दिले!

बोरिवली पश्चिमेचा स्कायवॉक बनला भिकारी, गर्दुल्ल्यांचा अड्डा!

ऐन गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी

बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम

त्या एसीपीने म्हटले आहे की, वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या खोलीत एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग, गुप्तचर विभागाचे प्रमुख आशुतोष डुंबरे तसेच गृहमंत्री उपस्थित होते. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वाझे याला अँटिलिया आणि मनसुख हिरनेबाबत विचारणा केली. त्यावेळी वाझे म्हणाला की, अँटिलिया प्रकरणात कोणताही दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा नाही तसेच हिरेन यांनी आत्महत्या केली असावी. अर्थात, त्यासंदर्भातील शवविच्छेदन अहवाल यायचा आहे. पण जयजीत सिंग यांनी दहशतवादाचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही, असे स्पष्ट केले. शिवाय, हिरेन यांच्या मृत्यूबाबत केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच काय ते स्पष्ट करता येईल, असेही जयजीतसिंग म्हणाले.

Exit mobile version