अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे आणि रियाजुद्दीन काझी या दोघांचा जामीन गुरुवारी एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान, न्यायालयाने एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली कार ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या मुख्य आरोपी सचिन वाझे याने दुसऱ्यांदा तर रियाजुद्दीन काझी याने प्रथमच जामिनासाठी एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तसेच सचिन वाझे स्वतः व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे हजर होता. न्यायालयाने सचिन वाझेला दुसऱ्यांदा तर रियाजुद्दीन काझी याचा प्रथमच जामीन नामंजूर करण्यात आला आहे. दरम्यान एनआयएने आरोपपत्रासाठी न्यायालयाकडे मागितलेली ३० दिवसाची मुदतवाढ मंजूर केली आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये मुसलमानांनी पुन्हा मंदिर उध्वस्त केले
एसटी महामंडळात अवतरणार भाड्याची बस
आयएनएस विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवले हेलिकॉप्टर
राज्याच्या खजिन्यात जमा झाला इतका जीएसटी
अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात एनआयए पाच आजी-माजी पोलिसांसह दहा जणांना अटक केली असून हे सर्व जण न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहे. या प्रकणात एनआयएन या प्रकरणात युआयपीए कायदा लावण्यात आलेला आहे.