30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरक्राईमनामावसईत तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

वसईत तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

प्रियकराचे कृत्य, गृहमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश

Google News Follow

Related

वसईमध्ये भर रस्त्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवार, १८ जून रोजी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे.

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (वय २९ वर्षे) आणि आरती यादव (वय २२ वर्षे) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, आरती ही अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती.

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली. हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मयत आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती. आरोपी यादव आरतीवर वार करत असताना लोकं व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते. कोणीही तिला वाचवायला पुढे आले नाही. एक तरुण फक्त आरोपीला अडवायला पुढे होता. मात्र त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. लोकं पुढे आली असती तर आरतीचे प्राण वाचले असते, असे पोलिसांनी सांगितले.

सोशल मीडियावर या भयानक घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणाच्या हातात भलामोठा पाना दिसत असून शेजारी तरुणी पडलेली दिसत आहे. तिच्यावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी रोहित ‘क्यूं किया, क्यूं किया ऐसा मेरे साथ’ असे ओरडताना ऐकू येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार होत असताना तिथे बरेच लोक उपस्थित होते.

हे ही वाचा:

गोहत्येच्या संशयामुळे दोन गटात राडा!

गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!

पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले ५० लाख रुपये

राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कठोर कारवाई करण्याचे निर्देश

याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा