24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाशिक्षणाधिकाऱ्यांकडील मालमत्ता पाहून पोलिसही हबकले

शिक्षणाधिकाऱ्यांकडील मालमत्ता पाहून पोलिसही हबकले

Google News Follow

Related

नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. शिक्षणसंस्थेकडून ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलेल्या आणि चौकशीनंतर घरी परतलेल्या वैशाली वीर-झनकर या फरार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री उशीर झाल्यानं वैशाली यांना समज देऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र अद्यापही त्या हजर झालेल्या नाहीत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार असल्याचं न्यायालयात सांगितले. तर इतर आरोपी पंकज दशपुते आणि ज्ञानेश्वर येवेल या दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहेत. झनकर यांच्या चौकशीनंतर त्यांच्याकडे असलेली मालमत्ता पाहून पोलिसही हादरून गेले आहेत. त्यांच्याकडे जमिनी, सदनिका, गाड्या अशी भरघोस मालमत्ता असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले आहे.

तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरीता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज रमे दशपुते यांनी ६ जुलै २०२१ ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी ९ लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. २७ जुलैला तडजोडीअंती ८ लाख रुपये वैशाली झनकर यांनी मान्य केले. बुधवारी (काल) संध्याकाळी साडेपाच वाजता शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फ़त ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई नाशिकमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरते आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून

अश्विनी उपाध्याय यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत

भारतात येणार चार नव्या हवाई कंपन्या?

चौकशीनंतर झनकर या घरी परतल्या. महिला असल्यामुळे सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने एसीबीनं समन्स बजावत त्यांना घरी पाठवलं होतं. सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत वैशाली न्यायालयात हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन संशयित वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वीर यांच्यासोबत हमी घेतलेल्यांवर कारवाई करणं अपेक्षित असल्याचं सरकारी वकील असर मिसर यांनी म्हटलंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा