26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाशेकोटीजवळ हात शेकत असताना भिंत कोसळली आणि...

शेकोटीजवळ हात शेकत असताना भिंत कोसळली आणि…

उत्तराखंडमधील हरिद्वार येथील घटना

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली.लहाबोली गावाजवळील माजरा मार्गावर असलेल्या वीटभट्टीच्या भिंतीखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोतवाली मंगळूर परिसरातील लहाबोली गावात शानवी ब्रिक्स फिल्ड नावाची वीटभट्टी आहे.२६ डिसेंबर मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आठ मजूर एकत्र हाथ शेकत बसले होते.त्यांच्या बाजूला एक कच्या विटांची भिंत होती जी अचानक कोसळली.त्यात सर्व कामगार गाडले गेले.या दुर्घटनेत विटा बघून नेणाऱ्या काही जनावरांचाही मृत्यू झाला.

हे ही वाचा:

मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!

खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक

जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवून कामगारांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला होता. एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मुकुल (२८) मुलगा सुभाष गाव रा. उदलहेडी ,साबीर (२०) मुलगा मेहबूब, रा. मिमलाना, मुझफ्फरनगर. ,अंकित (४०) मुलगा धरमपाल गाव उदलहेरी, बाबुराम (५०, रा. काळूराम यांचा मुलगा, रा. लहाबोली) , जग्गी (२४) मुलगा बिसंबर, रा. पिन्ना, मुझफ्फरनगर, समीर मुलगा मेहबूब, रहिवासी गाव मिमलाना जिल्हा मुझफ्फरनगर अशी मृतांची नावे आहेत तर रवी मुलगा राजकुमार (२५) बरौत आणि इंतेझार मुलगा लतीफ (२५), रा. चुडियाला ही जखमींची नावे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा