धामी सरकारचे योगींच्या पावलावर पाऊल

९ गुंडांना केले जेरबंद

धामी सरकारचे योगींच्या पावलावर पाऊल

हरिद्वार पोलीसांनी , गुन्हे करून अवैध मालमत्ता कमावणा ऱ्यां गुंडांवर आता मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त केली आहे.  उत्तराखंडच्या भाजपा सरकारने आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर मार्गक्रम करत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी पोलिसांना गुन्हे आणि अवैध धंदे करून पैसे कमावणाऱ्या गुंड आणि माफियांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्तराखंडच्या पोलिसांनी अशा लोकांची मालमत्ता जप्त करून कारवाईला सुरवात केली आहे.  यांचं मोहिमेचा एक भाग म्हणजे हरिद्वार पोलिसांनी नऊ आरोपींची कायद्याअंतर्गत ओळख पटली आहे.

पोलिसांनी या कारवाईत एकूण नऊ गुंडांची नऊ कोटी ६० लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्ता जप्त केलेला अहवाल त्यांनी हरिद्वार जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. ज्या आरोपींच्या मालमत्ता जप्त करायच्या आहेत ते म्हणजे राजा उर्फ इम्रान राहणार अश्रफ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची वीस लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. आरोपी कपिल त्यागी राहणार ब्रिजमोहन गाव करोडो पोलीस स्टेशन भगवानपूर, आणि आरोपी प्रवीण त्यागी राहणार राजकुमार गाव इकडी पोलीस स्टेशन, सर्घना जिल्हा मेरठ, जिल्हा मेरठ हॉल राहणार आर्यनगर गणेशपूर रुरकी हे बनावट औषध बनवणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत. ह्यांची मालमत्ता एक कोटी ७२ लाख असून , सुभानचा मुलगा खलील राहणार पाटचौक शहर लंधौरा मंगळूर, हा सुद्धा सराईत गुन्हेगार आहे. सुभांची एकूण संपत्ती एक कोटी ऐशी लाख १९ हजार रुपये आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

आरोपी विशाल सिराज गाव , अमरावती महाराष्ट्र हॉल , रहिवासी , आनंद विहार मक्खनपूर पोलीस स्टेशन भगवानपूर आणि आरोपी पंकज राहणार साधुराम  बहादर पूर पोलीस स्टेशन भगवानपूर हे सुद्धा बनावट औषधे बनवणाऱ्या टोळीत सामील आहेत. चार कोटी ४४ लाख ९४ हजार रुपयांची मालमत्ता , आरोपी अजय नौटियाल राहणार मीर सिंग आणि आरोपी रेणू हि मुलगी महिला आहे. हिने नॊकरीचे अमिश दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीशी संबंध आहे. हिचे एक कोटी ४३ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त करून, तसेच इतरही आरोपींची सर्व मालमत्ता जप्त करून त्या सर्वांचा अहवाल जिव्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

 

Exit mobile version