लग्न सोहळ्यात थुंकून रोट्या बनवणाऱ्या साहिलला अटक!

उत्तर प्रदेश मधील घटना

लग्न सोहळ्यात थुंकून रोट्या बनवणाऱ्या साहिलला अटक!

उत्तर प्रदेशातील मेरठमधून रोट्यांवर थुंकल्याची घटना पुन्हा समोर आली आहे. या घटनेमुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे.

हे प्रकरण मेरठच्या जानी पोलीस स्टेशन परिसरातून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल लग्नासाठी रोटी बनवण्यासाठी आला होता. रोटी बनवताना तो त्यावर थुंकत होता. रोटी बनवताना त्यावर थुंकल्याचा आरोप आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. व्हिडिओमध्ये साहिल रोट्यांवर थुंकताना दिसत आहे.

दरम्यान, साहिलचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले. यावेळी साहिलने आपली चूक मान्य केली आणि त्याबद्दल माफीही मागितली. गावकऱ्यांनी त्याला कान पकडून बसायला लावले आणि इशारा देऊन सोडून दिले. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : 

हे तर मोनालिसापेक्षाही गूढ स्मित…

शोध मोहिमेदरम्यान लष्कराच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

बांगलादेशातील परिस्थितीवर जगाचे मौन, पवन कल्याण म्हणाले- आता तुमचा राग कुठे आहे?

शंभूराजे म्हणाले, ठाकरेंनी आमच्याकडे बोट दाखवून स्वतः मुख्यमंत्री झाले!

Exit mobile version