उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

१२५ धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर उतरविले

देशभरात सुरू असलेल्या लाउडस्पीकर वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये जी पावले उचलण्यात आली त्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. तिथे सर्व धर्मियांशी चर्चा करून १२५ धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत तर १७ हजार लोकांनी स्वेच्छेने लाऊडस्पीकरचा आवाज अगदी कमी केला आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

प्रशांत कुमार म्हणाले की, लाऊडस्पीकरसंदर्भात ३७३४४ धर्मगुरूंशी चर्चा झाली. पोलिसांनी १२५ लाऊडस्पीकर उतरविले असून १७ हजार लोकांनी स्वेच्छेने लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. प्रशांत कुमार म्हणाले, शासन आणि पोलिस मुख्यालयाचे जे आदेश आहेत ते स्पष्ट आहेत की, उच्च न्यायालयांनी जे आदेश दिले आहेत, त्यांचे काटेकोर पालन व्हायला हवे.

जवळपास ३१ हजार ठिकाणी अलविदा नमाज अदा केला जाणार आहे. एकूण ७५ हजार ईदगाह आणि २० हजार मशिदींमध्ये नमाज पढली जाणार आहे. हे लक्षात घेता ४५ कंपनी पीएसी, सात कंपन्या सीआरपीएफ  आणि स्थानिक पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी  

एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार

साहित्य संमेलन राष्ट्रवादीच्या दावणीला

प्रशांत कुमार यांनी असेही सांगितले की, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी सांगितले आहे की, ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरून अनधिकृत लाऊडस्पीकर हटविल्यासंदर्भातील अहवाल सादर करा. हा अहवाल निर्धारित वेळेत न दिला गेल्यास कारवाई केली जाईल.

सध्या देशभरात लाऊडस्पीकरचा मुद्दा चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात मुंबईत म्हटले होते की, लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदींसमोर हनुमानचालिसा म्हटली जाईल.

 

Exit mobile version