उत्तर प्रदेशच्या धर्मांतराचे ‘कनेक्शन’ बीडपर्यंत

उत्तर प्रदेशच्या धर्मांतराचे ‘कनेक्शन’ बीडपर्यंत

उत्तर प्रदेशात गरिबीचा, असहाय्यतेचा फायदा उठवत सक्तीने धर्मांतर करणाऱ्या दोन मौलवींना अटक केल्यानंतर आता त्याचे ‘कनेक्शन’ महाराष्ट्रातही असल्याचे उघड झाले आहे. याच प्रकरणात बीड जिल्ह्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. अशी तीनजणांना अटक केली आहे. हे जाळे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, हरयाणा, केरळ इथे पसरल्याचे समोर येते आहे.

बीड जिल्ह्यातील इरफान शेख हा या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तो बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे. मात्र सध्या तो दिल्लीत असतो. दिल्लीतील बालकल्याण मंत्रालयात दुभाषी म्हणून तो काम करतो. मात्र त्याला आता सक्तीच्या धर्मांतर प्रकरणी दहशतवादी विभागाने ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये या दोन मौलवींच्या माध्यमातून १००० लोकांचे धर्मांतर केल्याचे उघड झाले होते. मूकबधीर मुले, अबला महिला यांना त्यासाठी लक्ष्य केले गेले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गुंडा अक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. आरोपींची मालमत्ताही यासंदर्भात जप्त करण्यात येणार आहे.

या मौलवी गौतमकडे अब्जावधीची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. तो धर्मांतरासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांना पैसे पुरवत असे. उमर गौतमचे याआधीचे नाव श्याम प्रताप असे होते. पण त्याचे धर्मांतर झाले आणि त्याने लग्नानंतर आपल्या पत्नीचेही धर्मांतर करून घेतले. धर्मांतर केल्याने त्याच्या वडिलानी त्याला कुटुंबातून बाहेर काढून टाकले.

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?

दरम्यान, यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाब विचारला आहे. या वृत्ताचा हवाला देऊन ते म्हणतात की, उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?

Exit mobile version