प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात

खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून कारवाई

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात

अयोध्येत २२ जानेवारी रोजी भव्य असा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, या सोहळ्याला अनेक दिग्गज आणि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अयोध्येला छावणीचे स्वरूप आले आहे. एटीएस कमांडोजनाही घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे. शिवाय या सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अयोध्येत अर्श डल्ला गँगशी संबंधित तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेश एटीएस आणि इंटेलिजन्सचे अधिकारी ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची चौकशी करत आहेत. गुरुवार, १८ जानेवारी रोजी संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून तपास केला जात आहे. डीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, “आतापर्यंतच्या तपासात त्यांचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची पुष्टी झालेली नाही.” दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.”

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत, यासोबतच देशभरातील अनेक दिग्गज मान्यवरांना देखील आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमिवर अयोध्योत मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे एटीएस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी ३६० डिग्री सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी अँटी-माइन ड्रोन देखील तैनात केले आहेत.

हे ही वाचा:

सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ वापरला, तक्रार दाखल!

ट्रेनमध्ये तिकीट परीक्षकाकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित!

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल!

राम मंदिर ट्रस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विधी २१ जानेवरी पर्यंत सुरू राहतील आणि प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी २१२ आचार्य विधीचे संचालन करतील. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी सुरू होईल आणि दुपारी १ वाजता पूर्ण होईल. त्यानंतर नरेंद्र मोदी संबोधित देखील करणार आहेत.

Exit mobile version