नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

उत्तर प्रदेश एटीएसने सहरानपूरमधून दोन जणांना अटक केली आहे. त्यातील एकाचा पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. एटीएसने सहरानपूरमधून दोन जणांना अटक केली आहे. त्यातील एकाचा पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. मोहम्मद नदीम असे या अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचे काम त्याला दिल्याचे नदीमने चौकशीदरम्यान कबूल केले आहे. नदीमकडून एक मोबाईल फोन, दोन सीमकार्ड आणि विविध प्रकारची स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण साहित्य जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईलमध्ये नदीम आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील दहशतवादी यांचे काही मेसेजेस आणि वॉईस मेसेजेस देखील आढळून आले आहेत.

हे ही वाचा:

कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या

‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’

एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शन

मोहम्मद नदीम हा व्हॉट्सऍप, मेसेंजर, क्लब हाऊस आणि टेलिग्रामच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे. नदीमला आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. नदीमकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version