तोंड झाकणाऱ्या मास्कपासून बनताहेत पायपुसणी; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

तोंड झाकणाऱ्या मास्कपासून बनताहेत पायपुसणी; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

नांदेड शहरामध्ये चौकाचौकात तसेच रस्त्यांवर विविध रंगी चटया दिसू लागलेल्या आहेत. परंतु या चटया पाहिल्यानंतर मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. वापरलेल्या मास्क पासून पायपुसणी बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.

मास्कपासून बनवलेल्या पायपुसणी नांदेड शहरातील रस्त्यांवर विकल्या जात होत्या. कापडी मास्क पासूनही या पायपुसणी बनवण्यात आलेल्या आहेत. आकाराने त्या छोट्या आहेत. वापरलेल्या मास्कपासून या पायपुसणी बनवण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या पायपुसणी कोरोना पसरवण्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच आता टाळेबंदी पाळूनही पुन्हा हे वापरले मास्क आणि त्यांच्यापासून बनवलेल्या वस्तू धोकादायक ठरू शकतात याची चिंता आता बळावली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने ह्या पायपुसणी जप्त केल्या. सर्जिकल मास्क आणि विविध प्रकारच्या मास्क पासून या पायापुसणी बनवण्यात आल्या आहेत. या मास्कपासून विविध रंगीबेरंगी वस्तू नांदेडमध्ये विकण्यासाठी चौकात ठेवलेल्या असल्यामुळे, अनेकजण याकडे आकृष्ट होत आहेत.

 

हे ही वाचा:

शिवसेनेकडून ‘बेस्ट’ला खड्ड्यात घालण्याचा पराक्रम

कोण आहेत मोदींचे नवे सल्लागार अमित खरे?

‘महाविकास आघाडी सरकारने महाविद्यालये सुरू करण्यावरून केला खेळखंडोबा’

अंबरनाथ एमआयडीसीत वायूगळती; श्वसनाच्या त्रासामुळे ३० जण रुग्णालयात

 

परराज्यातून आलेले काही जण नांदेड शहरातील रस्त्यावर या पायपुसणी विकत होते. दिल्लीमधून पायपुसणी आणल्याचं या विक्रेत्यांनी पालिकेच्या पथकाला सांगितले. महापालिकेच्या पथकाने आय टी आय चौकातील २ विक्रेत्यांकडून ही पायपुसणी जप्त केली आहेत.

मुख्य म्हणजे वापरलेले मास्क कुठेही फेकून देणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भिती असते. परंतु शहरात या कुठल्याच गोष्टीचे ताळतम्य नाही हेच दिसून आलेले आहे. वापरलेले इतके मास्क वस्तू बनविण्यासाठी उपलब्ध झालेच कसे असा प्रश्न आता सध्याच्या घडीला पडलेला आहे

Exit mobile version