निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला असताना आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईत खोट्या प्रतिज्ञापत्रांचा घोटाळा उघड झाला आहे. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वांद्रे मधील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई क्राईम ब्रांचने ही मोठी कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि काही आमदारांनी उठाव केला तेव्हा शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत प्रतिज्ञापत्र सादर केली होती. शिवसैनिकांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रतिज्ञा पत्रांसाठी मोठ्या प्रमाणात बनावट आयकार्डचा वापर करण्यात आल्याची माहिती असल्याचे वृत्त ‘ टीव्ही ९’ ने दिले आहे.
मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईत मोठी कारवाई केली असून यावेळी पोलिसांनी वांद्रे, माहिम परिसरात धाड सत्र राबवले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र हस्तगत केली आहेत.
हे ही वाचा:
अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली
मुंबईत ४ हजार ६८२ खोटी प्रतिज्ञापत्र बनवली गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ही सर्व बनावट प्रतिज्ञापत्र जप्त केली असून ठाकरे गटाने खोटी प्रतिज्ञापत्र बनवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.