सुधा मूर्तींच्या नावावर अमेरिकेतील महिला करत होती वसुली

एग्झिक्युटिव्ह असिस्टंट ममता संजय यांनी ही तक्रार दाखल केली

सुधा मूर्तींच्या नावावर अमेरिकेतील महिला करत होती वसुली

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी कर्नाटकमधील बेंगळुरूच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये आयोजित होणाऱ्या दोन कार्यक्रमांमध्ये त्यांचा नावाचा वापर करून प्रचार केला जात होता. या प्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे.

 

सुधा मूर्ती यांची एग्झिक्युटिव्ह असिस्टंट ममता संजय यांनी ही तक्रार दाखल केली आहे. एक प्रकरण ‘कन्नड कूट ऑफ नॉदर्न कॅलिफोर्निया’ (केकेएनसी)शी संबंधित आहे. ही संस्था त्यांच्या ५०व्या वर्धापन दिनाची तयारी करत आहे आणि त्यासाठी त्यांनी मूर्ती यांना आमंत्रण दिले आहे. मात्र त्यांनी काही कारणांनी हे आमंत्रण स्वीकारले नाही. मात्र तरीही या संस्थेने त्यांच्या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत सुधा मूर्ती यांचे नाव वापरले आहे, असे आढळून आले आहे.

हे ही वाचा:

ट्रुडो यांना मंत्र्याकडून घरचा आहेर; खलिस्तानी चळवळीची करून दिली आठवण

नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!

जोशीमठला आता नवे बांधकाम नको!

भारतीय महिला संघाची आशियाई स्पर्धेत श्रीलंकेला नमवत सुवर्णकामगिरी

 

या पत्रिकेत मूर्ती यांचे नाव प्रमुख पाहुणे म्हणून देण्यात आले आहे. केकेएनसीच्या आयोजकांनी सांगितले की, लावण्या नावाची महिला मूर्ती यांची पीए असण्याचा दावा करत असून त्या महिलेने मूर्ती कार्यक्रमाला येतील, असे आश्वासन दिले आहे.

 

तर, अन्य एक प्रकरण मूर्तींच्या नावे पैसे जमा करण्याशी संबंधित आहे. सुधा मूर्ती या २६ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असे सांगून एक श्रुती नावाची महिला लोकांकडून ४० डॉलर रुपये जमवत असल्याचा आरोप आहे. याबाबत माहिती मिळताच मूर्ती यांच्या टीमने पोलिसांना कळवले. पोलिसांनी लावण्या आणि श्रुतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही महिलांचा ठावठिकाणा शोधला जात आहे.

Exit mobile version