उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केले कृत्य

उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी कमी कपड्यांत सर्वत्र वावरणारी वादग्रस्त मॉडेल उर्फी जावेद विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिच्यासोबत व्हायरल व्हिडीओ मध्ये मुंबई पोलिसांची खोटी भूमिका करणाऱ्या दोन महिला आणि एक पुरुष यांना देखील गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे.

 

उर्फी जावेद या वादग्रस्त मॉडेलने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मुंबई पोलीस तिला अटक करण्यासाठी आलेत आणि तिला दोन महिला कॉन्स्टेबल आणि एक अधिकारी पोलीस जीप मध्ये बसवत असल्याचा रील बनवून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. उर्फीने बनविण्यात आलेल्या व्हिडीओमुळे तिला खरोखर अटक झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

हे ही वाचा:

बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

जरांगेंनी उपोषण सोडल्यावर राज्य सरकारची ठोस पावले

बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला नावावर केला

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

उर्फीकडून बनविण्यात आलेल्या व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची जनसामान्यात छबी खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई पोलिसांकडून या व्हिडीओची गंभीरपणे दखल घेण्यात आली,शुक्रवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांनी उर्फी जावेद आणि पोलीसांची भूमिका करणारे इतर तिघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १७१ (सरकारी कर्मचाऱ्याचा पेहराव करून फसवणूक),४१९ (फसवणूक), ५०० (बदनामी करणे)३४ (सह) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात अद्याप अटक करण्यात आलेली नसून इतर सह आरोपीना नोटीस देण्यात आली आहे. शनिवारी पोलीस उर्फीला पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात येईल.

Exit mobile version