हरयाणातील नूँह येथे झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने तौरू येथे बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. या हिंसाचारात ६ जण मृत्युमुखी पडले आहेत. दगडफेक, गोळीबार करत एका जमावाने हिंदूंच्या यात्रेवर हल्ला केल्याच्या या प्रकरणाने हरयाणात वातावरण पेटवले होते. पण आता त्याविरोधात हरयाणा सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे.
हरयाणाच्या नगरविकास खात्याने ही कारवाई केली आहे. चार तास चाललेल्या या कारवाईत २०० पेक्षा अधिक अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. त्यासाठी शीघ्र कृती दल आणि महिला पोलिसांची मदत घेण्यात आली. हरयाणाच्या नगरविकास खात्याचे अजित बालाजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत ही सगळी अतिक्रमणे हटविण्यात आली.
हे ही वाचा:
अमित शहा लोकसभेत पंडित नेहरूंबद्दल बोलले…विरोधक झाले निरुत्तर!
एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा योगायोग नाही
ठाण्यात एनसीसीच्या कॅडेट्सना अमानुष मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल
महाराष्ट्रातून प्रकल्प पळवल्याचे आदित्य ठाकरेंचे आरोप पोकळ
दरम्यान, ही कारवाई सुरू असताना या कारवाईच्या विरोधात काही महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला पण पोलिस दलांनी लागलीच त्यांना रोखले. प्रशासनाला ही माहिती मिळाली होती की, याठिकाणी अनेक बांगलादेशी लोक अनधिकृत पद्धतीने राहात होते. ते विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होते.
३१ जुलैला याठिकाणी हिंसाचार झाला होता. त्यात दोन होमगार्ड मृत्युमुखी पडले होते. विश्व हिंदू परिषदेने एका यात्रेचे आयोजन केले होते. त्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर हिंसाचाराची आग गुरुग्रामध्ये पसरली होती. पानिपत येथे एका दुकानाला आग लावण्यात आली होती. नूँहमध्ये तर अनेक गाड्याही जाळण्यात आल्या होत्या. सध्या सगळीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.