पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात आली, इन्स्पेक्टरने चुकून डोक्यात गोळी झाडली!

उत्तर प्रदेशातील अलीगढमधील पोलीस ठाण्यातील घटना,पोलीस अधिकारी निलंबित

पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात आली, इन्स्पेक्टरने चुकून डोक्यात गोळी झाडली!

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा अपघात झाला आहे.इन्स्पेक्टरने सरकारी पिस्तुलाने गोळी झाडली आणि ती गोळी थेट महिलेच्या डोक्याला लागली.गोळी लागल्याने महिला जमिनीवर कोसळली.गोळीबाराचा आवाज येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

गोळी लागल्याने जखमी झालेल्या महिलेला गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर निष्काळजी निरीक्षकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली असून त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अलीगढच्या कोतवाली पोलिस स्टेशनचे आहे. या ठिकाणी एक महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आली होती. ती इन्स्पेक्टरच्या टेबलासमोर उभी होती.इन्स्पेक्टरने एका पोलिसांकडून पिस्तूल घेतली अन ट्रिगर दाबले.गोळी थेट टेबलासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या डोक्यात लागली आणि ती महिला जमिनीवर कोसळली.

हे ही वाचा:

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द!

‘वाँटेड’ गुन्हेगारांनी भारतात या आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा!

पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’

तब्बल अडीच वर्षाने परतली टी-४२ वाघीण!

महिलेसोबत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने पळत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला.डोक्यात गोळी लागल्याने महिला रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत पडली.पोलिसांच्या मदतीने महिलेला तात्काळ जेएन मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसएसपींनी आरोपी इन्स्पेक्टर मनोज शर्माला तात्काळ निलंबित केले आहे. तसेच निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version