उत्तर प्रदेशातील गोंडा येथील एका महिलेने आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी किडनी दान केल्यानंतर तिच्या पतीने व्हॉट्सअॅपद्वारे तिहेरी तलाक दिला आहे.तरन्नुम असे किडनी दान केलेल्या महिलेचे नाव आहे.पीडित तरन्नुमचा पती मोहम्मद रशीद हा सौदी अरेबियात काम करतो आणि त्याने तरन्नूमकडे ४० लाख रुपयांची मागणी केली होती.तिने नकार दिल्यानंतर मोहम्मद रशीदने तिला ३० ऑगस्ट रोजी व्हॉट्सअॅपद्वारे पत्नीला तिहेरी तलाकचा मेसेज पाठवला.
तरन्नुम आणि रशीद यांचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले होते, मात्र रशीद नंतर नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला.त्यांच्या लग्नानंतर या जोडप्याला मुले झाली नाहीत, त्यामुळे रशीदने दुसरी पत्नी केली, असे तरन्नुमने म्हटले आहे.
हे ही वाचा:
लोकसभेतून आणखी तीन विरोधी खासदार निलंबित!
उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!
भारतीय नौदल बनवत आहे भूमिगत पाणबुडी बंकर
प्रशांत कारुळकर यांना मेजर जनरल विक्रांत नाईक यांच्याकडून सन्मानचिन्ह
दरम्यान, तरन्नुमचा भाऊ मोहम्मद शाकीर याची किडनी निकामी झाली होती आणि त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.भावाचा जीव वाचवण्यासाठी तरन्नुमने पाच महिन्यांपूर्वी तिची एक किडनी दान करण्यासाठी शस्त्रक्रिया केली.प्रक्रियेनंतर, तरन्नुम गोंडा येथे तिच्या सासरच्या घरी परतली.घरी आल्यानंतर तरन्नुमचे तिच्या पतीसोबत भांडण झाले.त्यानंतर संतापलेल्या रशीदने आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅपद्वारे तिहेरी तलाक दिला.
या घटनेनंतर तरन्नुम तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.तिने पतीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधेश्याम राय यांनी सांगितले की, तरन्नुमच्या तक्रारीनुसार तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.