अवघ्या ५० रुपयांसाठी ग्राहकाने दुकानदाराच्या बोटाचा घेतला चावा!

आरोपी अटकेत

अवघ्या ५० रुपयांसाठी ग्राहकाने दुकानदाराच्या बोटाचा घेतला चावा!

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.केवळ ५० रुपयांच्या वादातून एक व्यक्तीने दुकानदाराच्या बोटाचा चावा घेतला आहे.या घटनेनंतर दुकानदाराने रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाणे गाठले.दुकानदाराची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावून गेले.दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पीडित दुकानदाराला वैद्यकीय उपचारासाठी पाठवले आहे.

बांदा जिल्ह्यातील नरैनी कोतवाली परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी राहणारे शिवचंद्र कारवारिया हे कपडे विकण्याचे काम करतात.दुकानदार शिवचंद्र यांनी सांगितले की, एक ग्राहक फ्रॉक घेण्यासाठी त्याच्या दुकानात आला होता. त्याने एक फ्रॉक विकत घेतला आणि निघून गेला.

हे ही वाचा:

इराणने इस्रायलवर सोडलेली शकडो ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निकामी

भारतीय लष्करी जवानांची दुसरी तुकडी मालदीवमधून परतली!

काँग्रेसचे विशाल पाटील मविआ उमेदवाराविरोधात उभे राहणार!

न्याय संहिता, गरिबांना घरे, मोफत अन्न, नोकऱ्यांची हमी…. भाजपचा जाहीरनामा मोदींनी केला घोषित!

दुकानदार पुढे म्हणाला की, दुसऱ्या दिवशी तो ग्राहक पुहा दुकानात परतला आणि त्याने सांगितले की, खरेदी केलेला फ्रॉक हा छोटा असून थोड्या मोठ्या आकारामध्ये हवा आहे. यावर दुकानदाराने त्याला सांगितले की मोठ्या फ्रॉकसाठी आणखी ५० रुपये द्यावे लागतील.मोठ्या आकाराच्या फ्रॉकसाठी आणखी ५० रुपये द्यावे लागणार यावरून दोघांमध्ये वाद झाला.या वादात ग्राहकाने दुकानदाराच्या डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला.याचवेळी दुकानदाराचा मुलगाही आला.ग्राहकाने मुलाला पाहून त्याच्याही बोटाचा चावा घेत त्याला जखमी केले.आरोपीने दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला, असे दुकानदाराने सांगितले.

दरम्यान, कोतवाली नरैनीचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) सुरेश सैनी यांनी सांगितले की, दुकानदाराच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version