25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामामुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

अज्ञात व्यक्तीने ११२ क्रमांकावर मेसेज केला

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतांनाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी मिळाल्यानंतर लखनऊमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने आणीबाणीची सुरु केलेल्या ११२ क्रमांकांवर संदेश पाठवून मी साम योगी यांना लवकरच मारीन अशी धमकी या व्यक्तीने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपर्क अधिकारी शिखा अवस्थी यांनी हा संदेश बघितला. या संदेशात मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या मेसेजचा स्क्रिन शॉट घेतला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ही धमकी देणारी व्यक्ती कोण आहे याचा आता पोलीस तपास घेत आहेत.

धमकी मिळाल्यानंतर ११२ च्या ऑपरेशन कमांडरने सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ५०६, ५०७ आणि आयटी कायदा ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही . उत्तर प्रदेशात योगी सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. आठवडाभरापूर्वीही त्यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट बागपतच्या अमन रझा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती, या पोस्टमध्ये योगी यांना गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली होती, त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

हे ही वाचा:

पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी

डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?

ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’

भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २४ एप्रिल रोजी कोचीच्या नियोजित भेटीदरम्यान आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारे पत्र लिहिणाऱ्या एका व्यक्तीला रविवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव झेवियर असे आहे. केरळ भाजपचे प्रमुख के सुरेंद्रन यांनी शनिवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल गेल्या आठवड्यात पत्र मिळाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा