काश्मीरमध्ये वासुकी नाग मंदिराची तोडफोड

काश्मीरमध्ये वासुकी नाग मंदिराची तोडफोड

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एका प्राचीन मंदिराची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. वासुकी नाग मंदिराची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. मंदिराला नुकसान पोहचवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे या मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वासुकी नाग मंदिराचे दरवाजे व खिडक्या तुटल्या असून मंदिरातील मूर्तीवरही दगडफेक करण्यात आली आहे. सकाळी पुजारी मंदिरात पोहचले असता त्यांना ही माहिती मिळाली. त्यानंतर पुजाऱ्याने परिसरातील लोकांना आणि पोलि‍सांना याची माहिती दिली. ही बातमी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर या मंदिरावरील हल्ल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांविरोधात सचिन वाझे आता अधिकृतरित्या माफीचा साक्षीदार

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!

जीवे मारण्याच्या धमकीनंतर नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा

मूर्तींवर दगडफेक केल्याने मूर्तींचे चेहरे तुटल्याचे सांगण्यात येत आहे. शिल्पांचीही मोडतोड झाली असून नुकसान झाले आहे. लोक म्हणाले की, हे मंदिर प्राचीन आहे आणि त्यांची त्यावर श्रद्धा आहे. मंदिराची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करत येत आहे.

Exit mobile version