31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामातस्करीची झाली मस्करी, शर्टच्या बटणांमध्ये लपवलेले सोने पकडले!

तस्करीची झाली मस्करी, शर्टच्या बटणांमध्ये लपवलेले सोने पकडले!

दिल्ली विमानतळावर सोने तस्कराला कस्टम विभागाने केली अटक

Google News Follow

Related

देशासह राज्यातील विमानतळावर दररोज सोने-चांदीसह अमली पदार्थ जप्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तस्कर नव-नवीन शक्कल वापरून सोने-चांदी, ड्रग्जची तस्करी करत आहेत. अशा तस्करांवर कस्टम विभाग नजर ठेवून असतात. याच दरम्यान, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची अनोखी तस्करी उघडकीस आली आहे. एका भारतीय प्रवाशाने आपल्या शर्टाच्या बटनांमध्ये सोने लपवून आणल्याचे समोर आले आहे. कस्टम विभागाने कारवाई करत सोने जप्त केले आहे.

६ जानेवारी रोजी ही घटना घडली. प्रवासी विमान क्रमांक SV-७५६ ने सौदी अरेबियातील जेद्दाहून दिल्लीला पोहोचला होता. यावेळी प्रवासी विमानतळावरील ग्रीन चॅनलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. याचा दरम्यान, कस्टम अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे प्रवाशाला थांबवले. यानंतर त्याच्या सामानाची झडती घेतली आणि स्कॅन केले असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

तपासादरम्यान, चांदीचा मुलामा असलेल्या अंगठ्या सापडल्या, ज्या प्रत्यक्षात २४ कॅरेट सोन्याने बनवलेल्या होत्या. या अंगठ्या कपड्यांच्या बटणाचे स्वरूप देऊन लपवल्या जात होत्या. याचे वजन केले असता ३७९ ग्रॅम असल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत २९ लाख रुपये इतकी असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाने हे सोने जप्त करून पुढील कारवाई सुरु केली आहे.

हे ही वाचा : 

इंटरपोलप्रमाणे भारताचा आता ‘भारतपोल’; नवे पोर्टल कसे करणार काम?

२००२मध्ये आरएसएस कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी माकपच्या गुंडांची जन्मठेप कायम

नागपुरात एचएमपीव्हीची दोन मुलांना लागण

समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा