विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध

तीन दिवसांत १२ विविध विमानांना धमक्या

विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध

गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे याचा परिणाम विमान वाहतुकीवर होत असून सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न उद्भवला आहे. गेल्या तीन दिवसांत १२ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या अशा प्रकराच्या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या घटनांवर प्रतिक्रिया देताना अशा प्रकारच्या विघ्नकारी कृत्यांबद्दल चिंता असल्याचं म्हणत या धमक्यांचा निषेध केला आहे.

विमान कंपन्यांना सततच्या बॉम्ब धमक्या मिळाल्यानंतर गृह मंत्रालयाने बुधवारी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अहवाल मागवला होता. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनीही या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी त्यांनी सांगितलं की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी बॉम्बच्या धमकीच्या सर्व प्रकरणांचा सक्रियपणे तपास करत आहेत. तसेच सरकार देखील सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांत अनेक विमानांना बॉम्बच्या धमक्यांचा सामना करावा लागला आणि त्यानंतर या धमक्या खोट्या ठरल्या. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली असल्याची माहिती मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली.

दरम्यान, आज अकासा या विमान कंपनीचं विमान बंगळुरुला जाण्यासाठी निघालं होतं, पण ते नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर परतलं. विमानात बॉम्ब असल्याची धमकी आल्याने हे विमान दिल्लीला परतलं. मागच्या तीन दिवसांतली ही १२ वी धमकी आहे. यापूर्वी मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर ते विमान उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर या विमानाचे आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले होते. दरम्यान, विमानात बॉम्ब असल्याच्या अशा प्रकारच्या धमक्यानंतर आता केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

हे ही वाचा : 

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

सीमेपलीकडील दहशतवाद दोन देशांमधील व्यापार आणि संबंधांमध्ये अडथळा आणतात

नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन

धमक्या प्राप्त झालेली काही विमाने

Exit mobile version