अंबानी पुत्राच्या शाही विवाहसोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी, दोघांवर गुन्हे दाखल

व्हीडिओ करण्यासाठी शिरले होते कार्यक्रमात

अंबानी पुत्राच्या शाही विवाहसोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी, दोघांवर गुन्हे दाखल

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उद्योजक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश केल्याच्या आरोपावरून दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की या दोघांना कार्यक्रमस्थळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुकमान मोहम्मद शफी शेख (28) आणि व्यंकटेश नरसैया अलुरी (26) अशी या दोघांची नावे आहेत आणि त्यांना दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पकडण्यात आले आहे. शेख हा व्यवसायाने व्यापारी आहे तर अलुरी हा आंध्र प्रदेशचा युट्यूबर आहे. या दोन्ही आरोपींनी दावा केला की ते हा शाही लग्न सोहळा बघण्यासाठी आले होते.

अलुरी याने असा असा दावा केला की, त्याला हा संपूर्ण शाही विवाह सोहळा त्याच्या कॅमेरात रेकॉर्ड करून त्याच्या चॅनेलवर दाखवयाचा होता असे एका अधिकाऱ्याने सांगितले, शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता, सुरक्षा रक्षक आकाश येवस्कर आणि त्याच्या सहकाऱ्याला केंद्राच्या पॅव्हेलियन १ जवळ आलुरी फिरताना दिसले. “दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नंतर त्याची चौकशी केली आणि सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर, अलुरीने स्वतःला युट्यूबर असल्याची ओळख सांगितली,आणि तो आंध्र प्रदेशचा असल्याचे उघड केले,”

एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले, “अलुरीने कार्यक्रमास्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. गेट क्रमांक २३ वरून बेकायदेशीरपणे, परंतु त्याला कोणतेही आमंत्रण नसल्याने त्याला आत जाऊ दिले नाही. नंतर, तो कसा तरी गेट क्रमांक १९ मधून प्रवेश करण्यास यशस्वी झाला.”

पोलिसांनी सांगितले की, अलुरीला निघून जाण्याची विनंती करण्यात आली होती परंतु तो तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवारी पहाटे २.४० च्या सुमारास शेखला जिओ वर्ल्ड सेंटरच्या पहिल्या मजल्यावर नियमित तपासणी दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले.

हे ही वाचा:

देशाला दिशा देण्याच्या कामात मीडियाचा महत्वाचा रोल!

खोटे नरेटिव्ह सेट करणारे विकासाचे दुश्मन !

शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत शरद पवारांनी खंजीर खुपसलं!

“विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढू”

 

“एका सुरक्षा रक्षकाला तो संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांनी त्याला आमंत्रण आहे का ते तपासले. मात्र त्याच्याकडे नसल्यामुळे त्याला सुरक्षा व्यवस्थापकाच्या ताब्यात देण्यात आले. त्याने उघड केले की तो पालघरचा आहे आणि त्याने गेट क्रमांक १० मधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता,” एका अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर शेख यांना परिसर सोडण्यास सांगण्यात आले, परंतु त्यांनी सूचनांचे पालन न केल्याने त्यांना बीकेसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. “दोघांविरुद्ध घुसखोरी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली. कायद्याच्या तरतुदींनुसार. त्यांना नंतर जाण्याची परवानगी देण्यात आली,” एका अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version