बॉलिवूड अभिनेते सैफ अली खानवर त्यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला हा दरोड्याच्या उद्देशातुन झाला असल्याचे फिर्यादीच्या जबाबात स्पष्ट झाले आहे. हल्लेखोराने हल्ल्यापुर्वी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, असे या गुन्ह्यातील फिर्यादी असलेल्या तैमुरच्या केअरटेकर असलेल्या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
वांद्रे पोलिसांनी सैफ अली यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हल्लेखोर कैद झाला आहे. त्याच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिसांची १० पथके हल्लेखोराच्या मागावर आहेत.
बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान हे वांद्रे येथील सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये १२ व्या मजल्यावर राहण्यास आहेत. गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरात घुसलेल्या एक अनोळखी व्यक्तीने सैफ अली खान आणि तैमुर याची केअरटेकर असलेल्या महिलेवर या व्यक्तीने चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात सैफ अली खान हे गंभीररित्या जखमी झाले असून केअरटेकर महिलेच्या हाताला चाकू लागून ती जखमी झाली आहे. जखमी सैफला तात्काळ उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी तैमुर याचा सांभाळ करण्यसाठी ठेवण्यात आलेली केअरटेकर महिलेचा जबाब घेऊन पळून गेलेल्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केअरटेकर महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, पहाटे २ वाजता मला काही आवाज ऐकून मला जाग आली, त्यावेळी बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि बाथरूमची लाईट चालू होती. करीना मॅडम तिच्या मुलाला भेटायला आल्या असतील असे केअरटेकर महिलेला वाटले, मात्र तिला जाणवले की काहीतरी गडबड आहे, म्हणून ती पुन्हा उठली, तेव्हा बाथरूमच्या दाराशी एका व्यक्तीचे डोके दिसले,म्हणून ती बाथरूममध्ये कोण आहे हे पाहण्यासाठी गेली असता एक इसम बाथरूममधून बाहेर आला आणि त्यांच्या धाकट्या मुलाच्या बेडकडे चालू लागला.
हे बघून केअरटेकर महिला पटकन उठली आणि सैफ अली खानच्या मोठ्या मुलाच्या बेडरूम जवळ गेली आणि एका व्यक्तीने हिंदीत तिला आवाज करू नको, नाहीतर जीवे ठार करीन अशी धमकी दिली. इसम हा सैफच्या मोठ्या मुलावर हल्ला करील म्हणून केअरटेकर महिला बेडरूमच्या आत जाऊ लागताच या व्यक्तीने तिच्या हातावर चाकूने हल्ला केला, केअरटेकर महिलेचा आवाजावरून घरातील इतर नोकर आणि सैफ अली खान आवाजच्या दिशेने धावत आले.
केअरटेकर महिलेने त्याला विचारले “तुला काय हवे आहे?” त्याने उत्तर दिले, “मला पैसे हवे आहेत.” मी त्याला विचारले की किती? .” मग तो इंग्रजीत म्हणाला “एक कोटी” सैफने या व्यक्तीला तू कोण आहेस असे विचारले आणि त्याला काय हवे आहे, तेव्हा त्याने हातातील लाकडी वस्तू आणि चाकूने सैफवर हल्ला केला. त्याच वेळी, ती आत आल्यावर त्या माणसाने तिच्यावरही हल्ला केला.
हे ही वाचा:
सैफ अली खानवर हल्ला अन पाकिस्तानला जखम, माजी मंत्री म्हणतो, भारतात मुस्लिम…
आतिशी, संजय सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने थोपटले दंड!
सैफचा हल्लेखोर सीसीटीव्हीत दिसला, पायऱ्या उतरतानाचा व्हीडिओ
‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल
आम्ही सर्वजण खोलीतून बाहेर पळत सुटलो आणि दार ओढले आणि मग आम्ही सर्वजण त्याच्याकडे धावलो. याचा फायदा घेत हल्लेखोर जिन्याच्या दिशेने पळून गेला. अनोळखी व्यक्ती, वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, काळपट रंग, सडपातळ शरीरयष्टी, काळी पँट आणि काळसर शर्ट घातलेला होता.
सैफ अलीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी सैफ अली खान यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेची फिर्याद घेऊन अनोळखी व्यक्ती वर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोराने केलेली पैशांची मागणी पूर्ण केली नसल्यामुळे त्याने धारदार शस्त्राने सैफ आणि केअरटेकर महिलेवर हल्ला केला असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.