मांसाहार नव्हे हवनवरून जेएनयूमध्ये डाव्यांचा डाव

मांसाहार नव्हे हवनवरून जेएनयूमध्ये डाव्यांचा डाव

रविवार, ११ एप्रिल रोजी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) डाव्या विद्यार्थी संघटनेच्या लोकांनी हिंसक हल्ला केला होता. या संदर्भात आता जेएनयू व्यवस्थापनाकडून एक विधान समोर आले आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, हा वाद केवळ कावेरी वसतिगृहातील रामनवमीच्या हवनावरून झाला होता.

जेएनयूचे रजिस्ट्रार रविकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) युनियनच्या विद्यार्थ्यांना कावेरी वसतिगृहात रामनवमी हवन करायचे होते. या हवनाला डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर वसतिगृह व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने हवन शांततेत पार पडले.

त्यानंतर घटनास्थळी गदारोळ झाला. कुलसचिव रविकेश यांच्या म्हणण्यानुसार, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मांसाहाराबाबत कोणताही विरोध केलेला नाही. शांततेत हवन संपल्यानंतर डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केला. या गोंधळाने काही वेळातच हिंसक वळण घेतले आणि यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

अभाविपच्या विद्यार्थ्यांनीच मांसाहाराचे समर्थन करणाऱ्या डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला होता, अशी खोटी बतावणी नंतर करण्यात आली होती. मात्र, आता जेएनयूच्या रजिस्ट्रारच्या वक्तव्याने या प्रकरणाचे सत्य समोर आले आहे. जेएनयूमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये हा वाद झाला होता. या हाणामारीमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते.

Exit mobile version