कुख्यात डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू?

कुख्यात डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू?

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र अद्याप त्याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला २७ एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे म्हटले जात आहे. तर त्याचा मृत्यू झाल्याचेही वृत्त समोर येत आहे. पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणातही छोटा राजनवर संशय आहे.

तब्बल २६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.

छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं होतं. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅकने तिकीट विकण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनच्या साथीने त्याने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडणी, हत्या, तस्करीचे अनेक आरोप आहेत.

हे ही वाचा:

पुण्यात आणखी ‘कडक निर्बंध’

वाझे आणि काझीच्या कोठडीत वाढ

जोधा अकबराचा सेट भस्मसात

‘विरूष्का’कडून कोरोनाबाधितांना दोन कोटींची मदत

छोटा राजन विरोधात १७ हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, २०१५ साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

Exit mobile version