जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत एक भुयार आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सांबा जिल्ह्यातील भारत- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत हे भुयार आढळून आले आहे. आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर हे भुयार आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाल्या आहेत.

जम्मूतील संजवान भागात २२ एप्रिल रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी सुरक्षा दलाच्या पथकाने दोन आत्मघाती हल्लेखोरांना ठार केले होते. या प्रकरणाच्या तपासात सीमा सुरक्षा दलाकडून (BSF) भुयाराचा शोध घेण्यात येत होता. त्यांच्या या तपासाला अखेर गुरुवार, ५ मे रोजी यश आले आणि सांबा जिल्ह्यात एक भुयार सापडले, अशी माहिती ‘बीएसएफ’चे पोलिस महानिरीक्षक डी.के. बुरा यांनी दिली. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी त्या दोन दहशतवाद्यांनी या भुयाराचा वापर केला असावा, असा संशय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘कोरोना संपताच CAA लागू होणार’

२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम

एलआयसी आयपीओ शेअर्सवर उड्या!

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत

गेल्या १६ महिन्यांतील हे पहिले भुयार असून दशकभराच्या कालावधीत काश्‍मीरमध्ये ११ भुयारे आढळली. सांबामधील हे भुयार आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५० मीटर आणि सीमेवरील कुंपणापासून ५० मीटर अंतरावर आहे. चमन खुर्द या पाकिस्तानी ठाण्याजवळ ते सापडले असून हे ठिकाण भारतापासून ९०० मीटर दूर आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version