25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाउमेश पाल हत्येप्रकरणी अश्रफच्या मेहुण्याला अटक!

उमेश पाल हत्येप्रकरणी अश्रफच्या मेहुण्याला अटक!

अतिक अहमद आणि अशरफ याच्या हत्ये संबंधित अनेक रहस्य उलघडण्याची शक्यता

Google News Follow

Related

यूपीतील उमेशपाल हत्याकांडात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. एटीएसने अश्रफच्या मेहुण्याला अटक केली आहे. अश्रफचा मेहुणा सद्दाम याच्या अटकेनंतर गुड्डू मुस्लिमाबाबत आणखी माहिती समोर येऊ शकते, असे मानले जात आहे. सद्दामवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

माफिया अतिक अहमदचा भाऊ अशरफ याचा मेहुणा सद्दाम याला उत्तरप्रदेशच्या एटीएस पथकाने दिल्लीतून ताब्यात घेतले आहे.अटक करण्यात आलेला सद्दाम हा उमेशपाल हत्याकांडानंतर फरार होता.त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, तसेच सद्दाम याच्याविरुद्ध बरेली मध्ये दोन गुन्ह्याची नोंद आहे.अशरफला अवैधरित्या भेटल्या बद्दल एक गुन्हा बिथरी चैनपूर पोलीस ठाण्यात दाखल आहे तर फसवणूक करून एका घराचा ताबा मिळून त्या घरातून चोरी केल्याप्रकरणी बारादरी पोलीस ठाण्यात दुसऱ्या गुन्ह्याची नोंद आहे.

हे ही वाचा:

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत

हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन!

निज्जरची हत्या पाकिस्तानकडून?

उमेश पाल याच्या हत्येनंतर सद्दाम याचे नाव पुढे आले.पोलिसांनी सद्दामला अटक केली असून एटीएसकडून त्याची चौकशी सुरु आहे.सद्दामला कोर्टात हजार करून जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात येणार आहे.
बोलले जात आहे की, सद्दामला अटक केल्यामुळे अतिक अहमद आणि अशरफ याच्या हत्येसंबंधित अनेक रहस्य उलघडू शकतात.

वेळोवेळी ठिकाणे बदलत होता सद्दाम
मिळालेल्या माहितीनुसार सद्दाम हा वेळोवेळी आपली ठिकाणे बदलत होता.सध्या सद्दाम याचे दुबई मधील फोटो व्हायरल झाले होते, त्यामुळे तो देश सोडून गेल्याचे बोलले जात होते, परंतु तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. काही काळापासून तो दिल्लीमध्ये राहुल आपली ठिकाणे बदलत होता. याच दरम्यान पोलिसांना सद्दाम याची माहिती मिळाली आणि त्याला दिल्लीमधील मालवीय नगर मधून अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा